विशेष

महाराष्ट्र जागृत जनमंच, नैतिक व्यासपीठ !

जळगाव : समाजातील बुद्धीजिवी वर्ग जो राजकारण पासून अलिप्त असतो,नोकरवर्ग जो निवृत्त होतो ,अशा बुद्धीमान,ज्ञानी, अनुभवी लोकांचा आम्ही एक समूह बनवला.जळगांव जिल्हा जागृत जनमंच. महाराष्ट्र जागृत जनमंच. येथे पदे फक्त जबाबदारी पुरतीच आहेत.निर्णय सामुदायिक घेतला जातो. सदस्य फी नाही. कारण आम्हाला कोणाचा पैसा आमच्या हातून खर्च करणे योग्य वाटत नाही.एकतर कोणी वस्तुनिष्ठ मदत करावी. जसे वाहन,जागा,मंडप ,स्टेशनरी वगैरे. नाही केली तर आम्हीच आमचा खर्च करावा.त्यामुळे धनसंचय होत नाही.अपहार करण्याची दुर्बुद्धी होत नाही. आमच्या सोबत येणाऱ्या सदस्यांना बोलवतो.गळ घालत नाही.त्यांनी त्यांचे स्वखर्चाने यावे, स्वखर्चाने जावे.खाली हात यावे, खाली हात जावे.

या संघटनेत आधिकतम प्रशासनाने मंजूर केलेल्या परिपत्रक नुसार मागणी करतो.धोरणात्मक निर्णय घेणे,बदलणे साठी मागणी करीत नाही.कारण धोरणात्मक मागणी बहुदा राजकीय पक्षांची जबाबदारी असते. त्यांचे आमदार खासदार असतात.

कोणी वंचित असेल तर मदत करतो.कोणी अतिरिक्त घेतले तर विरोध करतो.पण जेंव्हा मागणी पुर्ण होते, पिडीत, वंचित समाधानी होतो, तेंव्हा ते प्रकरण बंद करतो.कोणी अधिकारी चुकले किंवा जाणिवपूर्वक चुकीचे केले तरीही त्यांच्या मागे लागत नाही.सरकारी नोकर असेच करतात,अशी आमची खात्री आहे.कोणाला धडा शिकवणे,काटा काढणे, वठणीवर आणणे, त्रस्त करणे, नामोहरम करणे,शरण आणणे असे काम करीत नाहीत.तसे करणे अनैतिक समजतो.

पिडीतांना,वंचितांना, शेतकऱ्यांना, नोकरांना आम्ही सामाजिक, शासकीय, प्रशासकीय शेवटी राजकीय स्तरावर सुद्धा मदत करतो.तरीही यश मिळत नसेल तर कायदेशीर कोर्टाचा मार्ग ज्याने त्याने अनुसरावा अथवा नाकारावा.त्यासाठी पैसे जमा करणे, वकील लावणे या फंदात पडत नाही.न्यायिक व्यासपिठ तर सर्वांसाठी खुले असते.जर कोणी असे पैसे जमा केले किंवा दिले तर ती त्याची वैयक्तिक जबाबदारी असते.मुळातच तसे करू नये,अशी आमची सुचना असते.आमच्या सोबत असलेल्या किंवा आलेल्या माणसाने आरटीआय किंवा तत्सम अर्ज टाकून पैशांची मागणी केली तर देऊ नये.उलट आमच्या कडे तक्रार करावी.आरटीआय अर्जाला घाबरून कोणी पैसे दिले तर आम्ही त्याची तक्रार घेत नाहीत.तो सुद्धा तितकाच दोषी समजला जातो.तो तुमचा माणूस पैसे मागतो,अशी तक्रार करण्याआधी आमच्या कडे तक्रार करावी किंवा परस्पर पकडून द्यावे.

जळगाव जिल्हा जागृत जनमंच किंवा तालुका स्तरावरील जागृत जनमंच जर आर्थिक वसुली करीत असतील तर आम्ही विरोध करतो.तरीही कोणाचा तसा अट्टाहास असेल तर तो त्यांनी वैयक्तिक स्तरावर करावा.आम्ही समर्थन करीत नाहीत म्हणून जबाबदारी घेत नाहीत.

आमच्या सोबत असणारे सदस्यांचा कोणी शत्रू असेल तरीही आम्ही त्याला जनमंच चा शत्रू मानत नाही.मित्राचा शत्रू म्हणून तो आमचा शत्रू,असे मान्य नाही.शत्रूचा शत्रू म्हणून जनमंच चा मित्र असे मान्य नाही.जो आमची तत्वे मान्य करतो,तोच आमचा मित्र.जो आमच्या तत्वाला मानत नाही, विरोध करतो तरीही तो आमचा शत्रू नाही.कारण आमचे कार्य हे सामाजिक, शासकीय, प्रशासकीय, राजकीय स्तरावरील आहे.

जागृत जनमंच ची जबाबदारी सोपवतांना स्पष्ट उल्लेख करीत आहोत कि, आर्थिक वसुली करणे व धार्मिक,जातीवादी तेढ निर्माण करणे जनमंच ला मान्य नाही. समर्थन करीत नाहीत.आम्ही समाज,शासन, प्रशासन व राजकिय समांतर भुमिका घेत आहोत.

… शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे