शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भुसावळ येथे शिवसेनेचा ५६ वा वर्धापनदिवस साजरा
भुसावळ (ओमशंकर रायकवार) शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भुसावळ येथे शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या संघर्षमय शिवसेनेच्या वाटचालीचा मार्गदर्शन करत शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन व माजी जिल्हा प्रमुख जगदीश कापडे आणि प्रा. उत्तमराव सुरवाडे, माजी आमदार दिलीपराव भोळे, तालुका संघटक संतोष सोनवणे यांनी केले तर प्रमुख उपस्थिती पुनमताई बऱ्हाटे, भुराताई चव्हाण, बबलू बऱ्हाटे, निलेश महाजन,माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, ललितकुमार मुथा, तसेच सूत्रसंचालन प्रा.धीरज पाटील यांनी केले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख स्व.राजेंद्रजी दायमा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली. आहे तरी शिवसेनेचे सर्व अधिकृत संघटना व आजी माजी पदाधिकारी व महिला आघाडी आणि शिवसैनिकांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भुसावळ येथे उपस्थित होते .सदर वर्धापन दिनानिमित्त शिवभोजन संचालक उमाकांत शर्मा (नमा)यांच्यातर्फे अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली.