जळगाव जिल्हा

शिवभोजन संचालक उमाकांत उर्फ नमा शर्मा यांचा माध्यमातून वृक्षारोपण

भुसावळ (ओमशंकर रायकवार) युवा सेना प्रमुख पर्यावरण मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांचा १३ जून हा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुका आणि भुसावळ शहराच्या शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा निश्चित चाललेला होता परंतु त्याच दरम्यान माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचं दुःखद निधन झालं त्यामुळे त्याच दिवशी हा कार्यक्रम घेणे संयुक्तिक नव्हतं म्हणून हा नियोजित कार्यक्रम आज वृक्षारोपणाचा घेण्यात आला.

शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा यांच्या माध्यमातून या वृक्षरोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आलेली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रांमध्ये आदित्य ठाकरे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल घेतलेली आहे आणि जागतिक दर्जाचा आहे. पर्यावरण दिनाच्या दृष्टिकोनातून झाडं लावणं आणि जगवणं अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. झाडे लावण्याची मोहीम केवळ फोटो पुरती मर्यादित न राहता खऱ्या अर्थानं ती वास्तवात आली पाहिजे झाडे जगली पाहिजे वाचली पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे आयोजन केलेले आहे आणि मला खात्री आहे, येणाऱ्या काळामध्ये सबंध भुसावळ तालुक्यातून या मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळेल, असे प्रतिपादन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केले. १३ जून २०२२ पासून १९ जून २०२२ शिवसेनेच्या वर्धापन दिनापर्यंत शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपणाची मोहीम सुरू राहणार आहे, असे शिवभोजन केंद्राचे संचालक नमा शर्मा यांनी कळवले आहे.

या प्रसंगी माजी उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक धीरज पाटील, शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ, रेल कामगार सेना मंडळ अध्यक्ष ललित मुथा, हेमंत खंबायत, उपशहरप्रमुख राकेश खरारे, विभागप्रमुख अरुण साळुंखे, गोलू कापडे, अमोल पाटील उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे