13 कंत्राटी कर्मचारी तडकाफडकी कार्यमुक्त
धारणी (प्रतिनिधी) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत तालुक्यातील पाणंद रस्त्याच्या कामात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यासह १३ कंत्राटी कर्मचाऱ्यांविरूध्द सेवा समाप्तीची कारवाई जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी केली .
धारणी तालुक्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०१६-१७ व १७-१८ यावर्षात आदिवासी शेकऱ्यांना त्यांच्या शेतात जाता यावे यासाठी पाणंद रस्ता बांधण्याचे काम हाती घेतले होते . मात्र त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली . रोहयोची काम अपूर्ण असता पूर्ण दाखवून त्याचे लाखो रूपयांचे बिल काढण्यात आले . याबाबतच्या तक्रारीवरून मुख्य कार्यपालन जि.प. चे अधिकारी यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती . या कामात अनियमितता असल्याचा अहवाल चौकशी समितीने जि.प. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे सादर केला .
त्यानुसार, रोहयोचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दीपक कांबळे, तुळशीराम तांत्रिक सहाय्यक किशोर दहेडे , अनिल भिलवे , दयाराम जांभेकर , अमोल भोंडे , राजाराम भिलावेकर , पुरुषोत्तम खराबे , कास्देकर , विजय ढगे , कुंदन बनसोड , मो . जाहीद , मो . वाहीद , अशा बारा कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीचे आदेश जारी करण्यात आले . तसेच अनिल मालवीय या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई परंतु सेवा करण्यात आली . समाप्तीच्या कारवाईमधील नारायण सावरकर , विनय ढगे , कुंदन बनसोड , मो . जाहीद हे चार कर्मचारी सध्या सेवेत नसल्याची माहिती रोहयोच्या डेप्युटी सिईओ यांनी दिली आहे . या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू असून जे कोणी दोषी आढळून येईल त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल , असे जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी पंडा यांनी सांगितले .