दोंडाईचा शहरात शिवसेना व युवासेना आक्रमक
कोणत्याही परिस्थितीत शिवसेना-मित्र पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
दोंडाईचा : महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी-उलथापालथवर शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाके अगोदर स्वयंमस्फुर्तीने येथील शिवसेना-युवासेना-राष्ट्रवादी- काँग्रेस-आर.पी.आय. यासह इतर मित्र पक्ष एकत्र येत,कोणत्याही परिस्थितीत आम्ही सर्व मित्र पक्ष आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहणार असल्याचे मत त्यांनी भव्य रँली काढून गावात प्रदर्शित केले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल आण्णा माळी धुळे, माजी नगराध्यक्ष डॉ. बापूसाहेब रविंद्रजी देशमुख, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे,युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी, विश्वनाथ पाटील आदींनी फुलहार अर्पण करत रँलीला सुरुवात केली. तद्नंतर रँली आंबेडकर दरवाजा मार्ग, जामा मस्जीद, गाव दरवाजा, सोनार गल्ली, आझाद चौक, डि.आर. बी.ओ.डी.हायस्कुल, नवीन नगरपालीका इमारत, शिवाजी महाराज स्मारक, बँक ऑफ महाराष्ट्र, श्याम सुंदर, ग्यानचंद मेडीकल येथे रँलीचा समारोप करण्यात आला.
रँलीत यावेळी माजी मंत्री डॉ. हेमंतराव देशमुख,दोंडाईचा वरवाडे नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष डॉ.रविंद्र देशमुख, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल आण्णा माळी, उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, डॉ.भरत राजपुत, युवासेना जिल्हाप्रमुख आकाश कोळी, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, भाईदास आण्णा, शिवसेना तालुका प्रमुख ईश्वर पाटील, गिरीश पाटील, विश्वनाथ पाटील, गणेश परदेशी, शैलेश सोनार, राजु कोळी, राका शेठ रूपचंदानी, पंकज चैनानी, राहुल गिरासे, निलेश लोणारी, आबा चित्ते, तालुका युवाधिकारी सुमित देशमुख, प्रदीप पवार, सागर पवार, अँड. ज्ञानेश्वर पाटील, भुषण चौधरी, किरण कोळी, सुमित कागणे, अक्षय धनगर, मनोज परदेशी, सागर देसले, अंबालाल पाटील, महेंद्र धनगर, नरेंद्र धात्रक,विक्की पाटील,गोलु पाटील,विनायक सोनार,ज्ञानेश्वर मराठे, कल्याण पाटील, दिनेश चव्हाण, गणेश भदाणे, छोटू पाटील, अमोल पवार, कुणाल माळी, भुषण देसले, रवींद्र सदाराव, नामदेव भिल, विक्रम अहिरे, नंदलाल पाटील, छोटु साळुंखे, राष्ट्रवादीचे, दयाराम कुवर, रवी पाटील, कय्युम पठाण, पिंटु महाजन, भुपेन्द्र धनगर, आर.पी.आय.चे माजी नगरसेवक रामभाऊ माणीक, बिलाल बागवान, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.