राजकीय
शिवाजी महाराज, मुख्यमंत्र्यांचा फोटो का लावला नाही म्हणत शिवसैनिकांनी आमदारा सावंत यांच्या कार्यालयाची केली तोडफोड
सोलापूर : शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या संस्थेच्या कॉलेज कार्यालयाची तोडफोडीचा शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे. सावंत यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोटो का नाही लावला म्हणत शिवसैनिकांन ही तोडफोड केली आहे.
एकनाथ शिंदेसोबत असणारे शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या संस्थेच्या कॉलेजच्या कार्यालयाची शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान, सावंत यांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचा फोटो का नाही लावला म्हणत शिवसैनिकांन ही तोडफोड केली आहे. शिवाय बार्शीतील शिवसेना शहर प्रमुख भाऊसाहेब आंधळकरांच्या कार्यकर्त्यांनी हा तोडफोडीचा प्रकार केला असून तोडफोडीच्या प्रयत्नात महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या.