राज्यात शिवसेना अस्थिर करणाऱ्यांचा डाव हाणून पाडू : जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके
शिंदखेडा (यादवराव सावंत) राज्यात शिवसेना अस्थिर करणाऱ्यांचा डाव हाणून पाडू असा संकल्प धुळे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत केला आहे. शिंदखेडा तालुक्यात शिवसेना व युवासेना आक्रमक झाली असून सर्व प्रसंगांसाठी सज्ज झाली आहे.
राज्यात शिवसेनेतील काही आमदारांना इडीचा धाक दाखवून काही प्रलोभने देऊन शिवसेना अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे पण आज ज्यांनी बंडखोरी केली तेही निश्चित सेनेतच दाखल होऊन अस्थिरतेचा डाव निर्माण करणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडतील असा आत्मविश्वास माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील, जिल्हाप्रमुख हेमंत साळूखे यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला.
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून शिवाजी चौफुली ते भगवा चौफुली गांधी चौक या प्रमुख मार्गांवरून उद्धवसाहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है यासह विविध घोषणा देत रॅली काढली. सदर रॅलीत जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, माजी जिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील, मंगेश पवार, वसंत पाटील, तालुकाप्रमुख गिरीश पाटील, माजी तालुकाध्यक्ष विश्वनाथ पाटील, रमेश बोरसे, भाईदास पाटील, दिनेश बच्छाव, रावसाहेब सैदाणे, प्रदीप पवार, मनोहर गिरासे, गणेश परदेशी, शहरप्रमुख संतोष देसले, सागर देसले, नंदकिशोर पाटील, विनायक पवार, प्रदीप दिक्षीत, दरबारसिंग गिरासे ,अमोल राजपूत, विलास देसले, गोरख देसले, भूषण सोणवणे, लालचंद चौधरी, मनोज पवार, राका शेठ, दोंडाईचा कल्याण बागल, योगेश वाघ ,गुलाब साळूखे, रमेश अहिरे, कैलास अहिरे, चंद्रकांत बोरसे, महेश चौधरी, मनोज शिंपी, दीपक बोरसे, दीपक पाटील, हिम्मत वाकडे, उमेश पवार ,योगेश माळी, युवासेनेचे मयूर कदम ,मनोज पवार, योगेश कोळी, समाधान धनगर, अमोल राजपूत, सागर पवार, मनोज परदेशी, प्रेम परदेशी इत्यादी सहभागी झाले होते.