एकनाथ शिंदे बंड : उदय सामंतही गुवाहाटीत ; ‘ही’ आहे आतापर्यंतची यादी
मुंबई : कालपर्यंत शिवसेनेच्या सर्व बैठकांमध्ये सहभागी होत असलेले कॅबिनेट मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंतही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सहभागी व्हायचं नाही, अशी भूमिका घेत शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात बंडखोरी केलीय.
एकनाथ शिंदे यांच्या गोटातल्या आमदारांची संख्या 47 झालीय. यात शिवसेनेचे 38 आणि इतर 9 आमदार आहेत. यात 8 जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत. शिंदे गटातील दोन आमदार कैलाश पाटील आणि नितीन देशमुख हे मात्र परतले आहेत.
विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी बंडाला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेसोबत काही आमदार गुजरातमधील सुरतमध्ये आणि तिथून गुवाहाटीला गेले. सुरुवातीला 20-25 संख्या असलेले आमदार 40 च्या वर गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाने पाठवलेल्या आमदारांच्या यादीनुसार शिवसेनेचे एकूण 37 आमदार त्यांच्यासोबत आहेत. तर 9 अपक्ष आमदारही सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार
1) एकनाथ शिंदे (मंत्री)
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई (मंत्री)
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे (मंत्री)
15) अब्दुल सत्तार नबी
16) प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाठ
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील (मंत्री)
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे (मंत्री)
37) संजय राठोड
38) उदय सामंत (मंत्री)
एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार
1) बच्चू कडू (मंत्री)
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर (मंत्री)
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) सौ. गीता जैन



