प्रा. सतीश पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील मारवड येथील राहणार सहा. प्राध्यापक, हिंदी विभाग धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे कार्यरत असलेले प्रा. सतीश पाटील यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या वतीने डॉ. मु.ब.शहा: जीवन और साहित्य या विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले असता पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांना प्रो. जयश्री माणिकराव गावित, विद्यावर्धिनी सभेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धुळे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. विश्वास पाटील, शहादा, डॉ. पितांबर सरोदे, नंदुरबार व प्राचार्य डॉ. कृष्णा पोतदार, धुळे यांचे अनमोल सहकार्य लाभले. तसेच तापी परिसर विद्या मंडळ, फैजपूर चे अध्यक्ष लोकप्रिय आमदार दादासाहेब शिरीष चौधरी व सर्व पदाधिकारी आणि धनाची नाना महाविद्यालय, फैजपूर चे प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी यांनी त्यांचे अभिनंदन केले.