महाराष्ट्र

आजचे राशिभविष्य, शनिवार २ जुलै २०२२ !

मेष :-

सामाजिक कामात मदत कराल. सार्वजनिक कामातून प्रशंसा मिळवाल. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. वैचारिक चंचलता टाळण्याचा प्रयत्न करावा.

 

वृषभ:-

वादाच्या मुद्यांपासून दूर राहावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ नका. कामात काही बदल अचानक घडून येतील. प्रत्येक वेळी सावधान राहायला हवे. मित्रांसाठी खर्च करावा लागेल.

 

कर्क:-

उत्तम मानसिक स्वास्थ्य लाभेल. कौटुंबिक सौख्य द्विगुणित होईल. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या मिळतील.

 

मिथुन:-

स्वभावात उगाचच चिडचिड जाणवेल. प्रफुल्लता, स्फूर्ती यांचा काहीसा अभाव राहील. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्व द्याल. अनावश्यक खर्च केला जाईल. वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे.

 

सिंह:-

कौटुंबिक बाबीत गैरसमजाची शक्यता आहे. भावंडांचे सहकार्य मिळेल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी लागेल. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्या. तरुणांचे विचार जाणून घ्या.

 

कन्या:-

रेस, जुगारापासून दूर राहावे. कामात स्त्रियांची मदत मिळेल. स्त्री वर्गाच्या सहाय्याने चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलण्याने निर्धारित कामे पूर्ण कराल. नाहक खर्च होण्याची शक्यता

 

तूळ:-

कामासंदर्भात आज सतर्क राहावे लागेल. सहकार्‍यांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. व्यावसायिक शत्रूंवर बारीक लक्ष ठेवावे लागेल. नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेऊ नका. हाताखालील लोक विश्वासू मिळतील.

 

वृश्चिक:-

बरेच दिवस अडकून पडलेले प्रश्न सुटू लागतील. गुंतवणूक वाढवावी लागेल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. नवीन धोरण समोर ठेवावे लागेल. संपर्कातून लाभ होऊ शकतो.

 

धनू:-

मानसिकतेत हळूहळू बदल घडताना दिसेल. चिकाटी अधिक वाढवावी लागेल. घरातील प्रश्न सामोपचाराने सोडवावेत. सरळ मार्गाचा अवलंब करावा. समोर येणारे कोणतेही काम करण्याची तयारी ठेवा.

 

मकर:-

परिश्रम घेणे सोडू नका. कामे जिद्दीने पार पाडावीत. उत्साह कोणत्याही कारणाने कमी पडू देऊ नका. जुन्या गोष्टी उगाळण्यापेक्षा नवीन विचार आमलात आणा. समोरील उपयुक्त गोष्टींचा वापर करावा.

 

कुंभ:-

रखडलेल्या कामांना गती येईल. अपेक्षित लाभाचे मार्ग खुले होतील. मनाची चलबिचलता कमी होईल. थोडा उत्साह वाढवावा लागेल. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.

 

मीन:-

मानसिक स्थैर्य वाढवावे लागेल. कामाचे स्वरूप पक्के करावे लागेल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. क्रोधाला आवर घालावी.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे