महाराष्ट्र

शिळोना घाटात भीषण अपघात ; दोन तरुण ठार

शिळोना : पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिळोना घाटाजवळ दुचाकी आणि आयशर अपघातामध्ये दोन तरुण ठार झाल्याची घटना दिनांक २ जुलै २०२२ रोजी दुपारी बाराच्या दरम्यान घडली.

 

सविस्तर वृत्त असे की सुमेध सुरेश राठोड वय २० वर्ष रा. वानोळा पाचोळा ता. माहुर आणि निलेश शाम आडे वय २१ वर्ष रा. मेट ता. उमरखेड हे दोघे उमरखेड वरुन शिळोनाकडे दुचाकी क्रमांक एम. एच. २९ बि.आर. ४७०९ वरुन जात असताना शिळोना घाटाजवळ पुसद कडुन भरधाव वेगाने येनाऱ्या ( चाकोते कंपनीचे) क्रमांक एम. एच.२४ ए. बि. ८९९१ मालवाहू आयशरला धडक लागून भिषण अपघात झाला.

 

या अपघातात सुमेध हा जागीच ठार झाला, तर निलेश उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोघेही तरुण आपल्या भाचीच्या वाढदिवसाला जाताना ही अप्रिय घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके, बिट जमादार किसन राठोड, रावसाहेब शेंडे, शिवाजी भरोशे, सुनील ठाकरे, यांनी धाव घेतली. पुढील तपास ठाणेदार राजीव हाके करीत आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे