जळगाव जिल्हा
तापी नदीच्या पुलावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) आज दि.०२ जुलै रोजी तापी नदी पत्रात उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे.
घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोहचून शोध घेत आहे. सदर घटनेत तापी नदी पुलावर सायकल लावून नदी पत्रात उडी मारून आत्महत्या केली असून मयत इसमांचे नाव विजय डहाडे अंदाजे वय २७ वर्ष असल्याची माहिती प्रथमदर्शी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलीस प्रशासन झालेल्या घटनेचा शोध घेत आहे.