हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा ; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा
मुंबई : आज शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांसोबत बैठक पार पडली. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असा इशारा ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.
सध्या जे सुरु आहे, ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे. त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे, त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे. भाजपचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ.हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असा इशाराही ठाकरे यांनी शिंदे सरकारला दिला.
शिंदे सरकार पाच ते सहा महिने टिकेल – अजित पवार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे सरकारबाबत नुकतीच प्रतिक्रिया दिली होती. राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल, त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आता विरोधी बाकावर बसणार असलो, तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना स्पष्ट होईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडलं तर मध्यवर्ती निवडणुका लागतील. त्यामुळे त्याची तयारी आतापासून करा’. असं पवार म्हणाले होते.