गुन्हेगारी

नागपूर जिल्हातील सावनेर शहरात केशव लाॅज मध्ये प्रेयसी सोबत आलेल्या तरुणाचा मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर शहरात केशव लाॅज मध्ये प्रेयसी सोबत थांबलेल्या सत्तावीस वर्षीय तरुणाचा सेक्स स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची घटनेने खळबळ उडाली आहे.

 

सविस्तर वृत्त असे कि, अजय परतेकी वय २७ हा काल‌ दि. ३ जुलै रोजी संध्याकाळी सावनेर शहरातील केशव लॉज मध्ये आपल्या प्रेयसी सोबत आला होता. दोघे ही आत गेल्यानंतर थोड्यावेळाने अजय आपल्या रूममध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. घाबरलेल्या प्रेयसीने हाॅटेल मालक व मैनेजर ला सांगितले व त्याच्या मित्रांना बोलावले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना सूचना दिली. मृत अजयच्या खिशातून सेक्स स्टेमिना वाढवणारी गोळ्यांचा साठा मिळाला आहे. या गोळ्यांच्या अतिसेवनामुळेच ह्रदयविकाराच्या झटक्यानी त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला पुढील‌ तपास सुरु असल्याची माहिती मिळाली आहे .

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे