वैजापूर लाचखोर गटविकास अधिकारी अखेर लाचलुचपत विभागाच्या ताब्यात.
दिनांक: २१ जुलै २०२२
औरंगाबाद: प्रतिनिधि-गहनीनाथ वाघ:
अनेक दिवसापासून नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेला यश मिळुन आला आहे.वैजापूरचे गटविकास अधिकारी कैलास जाधव यांना लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले आहे. रो.ह.यो.अंतर्गत अनुदान मंजूर करण्यासाठी २० हजार रुपयेची मांंगितली होती लाच.
गट विकास अधिकारी कैलास तुकाराम जाधव (वय ५७ वर्षे, रा. सिडको, औरंगाबाद) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी पं.स. कार्यालयात करण्यात आली.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, या घटनेतील तक्रारदाराला त्यांच्या शेतात रोजगार हमी योजनेंतर्गत मोहगणी वृक्ष लागवड करायची होती. याबाबत अनुदान मंजूर करण्यासाठी प्रभारी गटविकास अधिकारी कैलास जाधव यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने औरंगाबाद लाचलुचपत विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे,पोलीस उपाधीक्षक दीपक साबळे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल खांबे व पोलीस उपाधीक्षक मारुती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पं.स. कार्यालयात सापळा रचला. त्यावेळी कैलास जाधव यांना तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. पोना. भीमराव जिवडे, दिगंबर पाठक, कॉन्स्टेबल सोमीनाथ थेटे यांच्या पथकाने ही कारवाई केली व गुन्हा दाखल करण्यात आला.