आदिवासी प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत शेतीपूरक व्यवसायासाठी असणाऱ्या योजनांचे अर्ज सादर करण्याचे आवाहन
तळोदा (प्रतिनिधी) आज आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र शासनाकडून भारतीय संविधानाचे अ.नु. २७५ (१) योजना अंतर्गत इंटिग्रेटेड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोग्राम अँड अलाइड (एनिमल हसबंडरी फिषेरीज डेअरी डेवलपमेंट इत्यादी) ऍक्टिव्हिटीज एफ. आय.आर.अँड सी.आर.एफ. बेनिफिशियरीज अंडर एफ .आर. ए. २००६ एकात्मिक कृषी विकास कार्यक्रम संलग्न (पशु सर्वधन, फिशरी डेअरी डेव्हलपमेंट इत्यादी) उपक्रमांतर्गत आय.एफ.आर. एन. सी. एस.आर. लाभार्थ्याचा विकास करणे, अंतर्गत पशुपालनासाठी शेळी गट पुरवणे.ह्या मंजूर योजनेअंतर्गत आदिवासी वनपट्टा धारक शेतकऱ्यांना शेतीस पूरक म्हणून पशुपालन व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी १० शेळ्या व १ बोकड लाभार्थ्यांना पुरविण्यात येणार आहे.
या योजनेसाठी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा जिल्हा नंदुरबार कार्यक्षेत्रातील तळोदा, अक्कलकुवा ,धडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिनांक २५ मार्च २०२२ ते दिनांक ०८ एप्रिल २०२२ रोजी पर्यंत शासकीय सुट्टी वगळता विभागात अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात खलील कागदपत्रे अर्जासोबत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
कागदपत्रात जातीचा दाखला, आधार कार्ड, दारिद्र रेषेखालील दाखला दाखला व उत्पन्नाचा दाखला, विधवा महिला शेतकरी /अपंग शेतकरी असल्याचा दाखला व प्रमाणपत्र, वन पट्टा प्राप्त प्रमाणपत्र दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक, अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, ग्रामसभा ठराव व यापूर्वी शासकीय योजनांमधून लाभ न घेतल्याचा दाखला. स्वयंघोषणापत्र, वन हक्क प्रमाणामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीचे नावे असल्यास एकाच व्यक्तीने लाभ घेणे आवश्यक असून इतर सदस्य व्यक्तीने ज्या व्यक्तीचे नावावर योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे त्याचेच सर्व कागदपत्रे सादर करावीत असे सूचित करण्यात आले आहे. जो व्यक्ती लाभ घेईल त्याचेच संमत्तीपत्र व कागदपत्रे स्वीकारण्यात येणार आहेत. तरी इच्छुक वनपट्टेधारक शेतकऱ्यांसाठी प्रकल्प कार्यालयात तळोदा येथे अर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून याच ठिकाणी अर्ज स्वीकारण्यात येणार असल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.