वडील नावाला कलंक लादणारी घटना ; न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरीची सुनावली शिक्षा
वैजापूर (प्रतिनिधी) वडिलांकडून स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्ह्या सिद्ध झाल्यामुळे वैजापूरचे जिल्हा सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायधीश एम. मोहिनुद्दिन एम.ए यांनी आरोपीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासलेल्या गौतम गोविंद बोर्ड राहणार विनायक साखर कारखाना, बोरसर ता वैजापूर असे न्यायालयाने शिक्षा केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.
१२ जुलै २०२० रोजी विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कायद्याखाली वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा न्यायाधीश एम. मोहिनुद्दीन एम.ए यांच्यासमोर अंतिम सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील नानासाहेब जगताप यांनी युक्तिवाद केला. त्यांनी एकूण सहा साक्षीदारांचे जवाब नोंदवले होते. यात पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली. सबळ पुराव्या आधारे अपराध सिद्ध झाल्याने आरोपीला ठरवत विनयभंगाच्या आरोपाखाली पाच वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. गुन्ह्यातील आरोपी हा कुटुंबासोबत विनायक साखर कारखाना बोरसर येथे राहत होता अल्पवयीन पीडित मुलगी आई व बहिणीसोबत घरात झोपली होती. त्या वेळी आरोपी घरात आला त्याने घरातील लाइट बंद करून मुलीच्या अंगावरील पांघरूण ओढले. त्यानंतर दुसरया दिवशी त्याने पीडितेला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून पीडित मुलगी लासूर स्टेशनला मामाकडे गेली. यापूर्वीही आरोपीने मुलीला कॉलेजला जाऊ नको, माझ्यासोबत चल असे वाईट हेतूने म्हणत विनयभंग केला. आरोपीविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात विनयभंग व बाललैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आला. यात पीडित मुलगी व तिच्या आईची साक्ष महत्त्वाची ठरली.