येत्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बोरद येथे समितीचे गठन
तळोदा (दिपक गोसावी) बोरद येथे बौद्ध विहार याठिकाणी रात्री ८.०० वाजता येत्या १४ एप्रिल रोजी होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समाजबांधवांची सभा घेण्यात आली. या सभेमध्ये गेल्या २ वर्षांपासून डॉ.बाबासाहेब यांची जयंती साजरी न करता आल्यामुळे समाजबांधवांमध्ये काही प्रमाणात नैराश्य निर्माण झाले होते. परंतू या वर्षी सर्व कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पडत असल्यामुळे या वर्षी बोरद येथेही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे संभेमध्ये सर्वानुमते ठरले आहे. या दृष्टीने जयंती सुव्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी समाज बांधवांनी एकत्र येत वरिष्ठांच्या मार्गदर्शनात जयंती निमित्त एका समितीचे गठन केले आहे.
या समितीध्येसमिती अध्यक्ष रतीलाल मोहिते, उपाध्यक्ष आकाश कुवर, सचिव प्रशांत सोनवणे, खजिनदार अजय पाटोळे, उपसचिव दिपक केदार, उपखजिनदार राहुल साळवे, सल्लागार सिद्धार्थ अहिरे, संघटीत सदस्य सागर ढोडरे, राहुल ढोडरे, आनंद साळवे, मिलिंद ढोडरे, गोकुळ ढोडरे, सुमीत ढोडरे, धर्मेश ढोडरे, रोहित ढोडरे, स्वप्नील कुवर, राहुल बैसाने, मोग्या कापुरे, यश ढोडरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. वरील कमिटीचे प्रमुख व वरिष्ठ सल्लागार म्हणून भिकलाल ढोडरे, अनिल ढोडरे, सागर ढोडरे, भावराव बिरारे, कन्हैयालाल ढोडरे, रवीन ढोडरे, मिलिंद ढोडरे, गणेश भामरे हे काम पाहणार आहेत.



