रंगपंचमीचे औचित्य साधून “सशक्त नारी शक्ति”च्या वतीने टीळा होळी कार्यक्रम संपन्न
भुसावळ (ओमशंकर रायकवार) भुसावळ येथील लोणारी मंगल कार्यालय येथे रंगपंचमी चा औचित्य साधून विविध महिला मंडळातर्फे “सशक्त नारी शक्ति” च्या वतीने टीळा होळी चे कार्यक्रम संपन्न झाले.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ शहरातील हिरकणी महिला मंच,मानवतकर बहुउद्देशीय संस्था,ग्राहक कल्याण मंच फांऊडेशन,महिला समन्वय व साईलीला बचत गट,सक्षम नारी फांऊडेशन व ज्वाईंट वसुंधरा सहेली गृुप ह्या सहा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने रंगपंचमी निमित्त दि. २३ मार्च रोजी लोणारी मंगल कार्यालय येथे दु.२:०० ते ४:३० वा.पर्यंच टीळा होळी कार्यक्रम घेण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे व्यासपीठा वर कार्यक्रम चे अध्यक्षा डाॅ.वंदना वाघचौरे, प्रमुख अतिथी सौ.ओवी सोमनाथ वाघचौरे,डाॅ.मधु मानवतकर डाॅ.महक रत्नानी, अॅड.जास्वंदी भंडारी, महिला पत्रकार उज्जवला बागुल सह अन्य मान्यवर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डाॅ.सुवर्णा गाढेकर यांनी केल्या. सर्वप्रथम आलेले सर्व महिलांचे टाळ्याने स्वागत करण्यात आले. नंतर डाॅ.महक रत्नानी (फिजीयोथेरीपिस्ट) यांने महिलांसाठी फिजीयोथेरिपी का गरजेची याचावर मनोगत व्यक्त केले. तदपश्चात कवियित्री सुनिता जोशी यांनी हास्यकवितेने लोकांचे मन मोकहे केले. काही महिलांनेही कविते सह सशक्त नारी शक्ती ह्या विषयावर मनोगतव्यक्त केले. प्रमुख अतिथी म्हणून आलेले भुसावळ डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या अर्धांगिनी सौ.ओवी सोमनाथ वाघचौरे यांनी अतिशय सुंदर अभंग सादर करुन सर्वांचेच लक्ष्य केंद्रीत केले.सदर कार्यकमास मला प्रमुख अतिथी म्हणुन आमंत्रित करुन शहरातील सशक्त नारी शक्तिने मला प्रेमाचे गुलाबी रंग दिले.आपल्या दैनिक कामकाजातून वेळ काढून महिलांनी महिलांसाठी असे कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे त्याने आपल्या दैनिक जीवनात उपयोग होतो. असे मनोगत ही सौ.ओवी वाघचौरे यांनी व्यक्त केल्या.
महिलांसाठी या ठिकाणी “आपण हे करु शकतो” असा एक खेळ आयोजित करण्यात आला. त्या खेळ मध्ये विजयी झालेल्या महिलांना बक्षिस वितरण करण्यात आले.नंतर सर्वंना रंगबिरंग गुलाल चे टीळे लाऊन व गाण्या च्या तालावर हर्षोल्लासाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी दोन वर्षाचे कोरोना काळात खचलेली मानसिकता ने बाहेर पडण्यासाठी व महिलांचे मनोबल बाढविण्याकरिता महिलांने महिलांसाठी हे कार्यक्रम सहा महिलामंडळाने एकत्र येवून आयोजित केले असे मनोगत कार्यकमाचे अध्यक्षा डाॅ.वंदना वाघचौरे व डाॅ.मधु मानवतकर यांनी व्यक्त केले. हार का ना जीत का होली त्यौहार है प्रीत का असी प्रेमाची दोन ओळीतच डाॅ.सुवर्णा गाढेकर यांनी मनोगत व्यक्त केले . सर्वात शेवटी अल्पोआहारा सह या कार्यकमास विश्रांती देण्यात आली.महिला पत्रकार उज्जवला बागुल यांनी सर्व आलेले महिलांचे व सशक्त नारी शक्ति चे आभार मानले.