महाराष्ट्रविशेष

जाणून घ्या आजचं राशीभविष्य, मंगळवार २६ जुलै २०२२

आजचं राशिभविष्यानुसार मेष राशीच्या व्यक्तींनी घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल.

मेष:- घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. वेळ हे सर्व गोष्टींवर औषध ठरेल. व्यापारातील फायदा भरून काढावा. वैवाहिक जीवन उत्तम राहील. आनंदाचा गुणाकार होईल.

वृषभ:- नवीन कामात हात घालावा. जमिनीच्या कामात यश येईल. मैत्रीचे संबंध जपावेत. मानसिक समाधान लाभेल. दिवस हास्य-विनोदात जाईल.

मिथुन:-  कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांसाठी खरेदी कराल. जोडीदाराबरोबर सौख्याचा अनुभव घ्याल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वेळेचा अपव्यय टाळावा.

कर्क:- नवीन ओळखीतून कामे होतील. काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्थिरता जाणवेल. आपलेच खरे करण्याचा प्रयत्न कराल. मत अधिक स्पष्टपणे मांडाल.

सिंह:- मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. कामात काही बदल करावे लागतील. जोडीदाराची साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मन प्रसन्न राहील

कन्या:- कौटुंबिक ताण हलका करावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. दिनक्रम व्यस्त राहील. गोड बोलून कामे करून घ्यावीत. आदर, आपुलकी कायम ठेवावी.

तूळ:-  घरातील कामात व्यस्त राहाल. व्यावसायिक विरोधकांना कृतीतून उत्तर द्याल. शांत राहून विचार करावा. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. वैयक्तिक मतभेद बाजूला सारावेत.

वृश्चिक:- जि‍भेवर ताबा ठेवावा, अन्यथा मन खिन्न होऊ शकते. करियर संबंधी स्पष्ट विचार ठेवावा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील.

धनू:- मुलांची बाजू समजून घ्यावी. खेळकर वृत्तीने वागावे. घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करावा. कामात बढतीचा योग आहे. मानसिक संतुलन राखावे.

मकर:- आर्थिक बाबीत जागरूक राहावे. महत्त्वाचे व्यवहार करताना सावध रहा. नोकरदारांनी नवीन योजना आखाव्यात. प्रवास सावधानतेने करावेत. धार्मिकतेकडे ओढ वाढेल.

कुंभ:- अधिकार्‍यांच्या सल्ल्यानेच वागावे. कुटुंबात मन रमेल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. उत्तम कार्यशैलीमुळे कौतुक केले जाईल. प्रवास पुढे ढकलावा.

मीन:- सकारात्मक विचारसरणीचा उपयोग होईल. मानसिक ताण कमी होईल. विश्वासाने कार्य करत राहावे. दिवस धावपळीत जाईल. जोडीदाराचा उत्तम सहवास मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे