साक्री : कन्हैयालाल पतसंस्थेच्या चेअरमनपदी डॉ. नितीन सोनवणे
साक्री (प्रतिनिधी) साक्री शहरातील कन्हैयालाल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. सन 2022-2027 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी अकरा सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीसाठी सहाय्यक सहकार अधिकारी बी.डी.मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संस्थेच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चेअरमन पदासाठी डाॅ.नितीन साहेबराव सोनवणे व व्हा.चेअरमन पदासाठी विजय मुकुंदराव भोसले यांचे अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बी.डी.मोहिते यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.
या बैठकीला पतसंस्थेचे संचालक डाॅ.दिलीप चोरडीया, नरेंद्र पेटकर, केशव भामरे, विनोद पगारिया, सौ.संगीता सोनवणे, मनोज थोरात, रखमाबाई बोरकर, अरुणाबाई बोराळे हे संचालक उपस्थित होते. याच बैठकीत महिला दिनाचे औचित्य साधून साक्री नगरपंचायत च्या महिला व बालकल्याण सभापती जयश्री विनोद पगारिया यांचा महिला संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पतसंस्थेचे जेष्ठ संचालक डाॅ.दिलीप केशरमल चोरडीया यांची हस्ती बॅंकेच्या व्हा.चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल डाॅ.नितीन सोनवणे यांनी संचालक मंडळाच्या वतीने सत्कार केला. या निवडणुक कामात बी.डी.मोहीते यांना मदत म्हणून पोद्दार नाना यांनी सहकार्य केले. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचाही सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे व्यवस्थापक कैलास ढोले, हेमंत भंडारी यांनी सहकार्य केले.