चोपडा व अमळनेर विभागातील पोलिस ठाणेची नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांच्या उपस्थितीत वर्षीक तपासणी
तपासणीत त्रुटी आढळल्याची गुप्तता ॽ
चोपडा (विश्वास वाडे) नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी ८ मार्च महिला दिनी चोपडा येथील पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयात चोपडा व अमळनेर विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या सक्त सूचना केल्या असल्याचे समजते.
पोलीस महानिरीक्षक यांना वाळकी येथील शेतकरी प्रकाश सुधाकर पाटील यांनी जवळपास साडेतीन एकरामध्ये अफूच्या पिकाची लागवड केली. त्यासंदर्भात अधिक माहिती विचारली असता ते म्हणाले की, अफूच्या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून जवळपास ३ कोटी ७७ लाख रुपये त्याची किंमत असून आरोपी प्रकाश सुधाकर पाटील यास अटक करण्यात आली आहे. आरोपीची कसून चौकशी सुरू असून त्याच्यामध्ये अजून कोण कोण सहभागी आहे याचा कसोशीने तपास सुरू आहे. लागवड केलेले अफू सदर आरोपी कोणाला विकणार होता? अजून इतर कोणी मास्टरमाईंड त्यात सहभागी आहेत का ? अशा सर्व प्रकारच्या संभाव्य बाबी विचारात घेऊन तपास करीत असल्याचे सांगितले. तपासकामी चोपडा ग्रामीण पोलिसांच्या मदतीला एल सी बी सहकार्य करीत असल्याचे त्यांनी म्हटले तसेच घोडगाव वाळकी शिवारा व्यतिरीक्त तालुक्यात, जिल्ह्यात अन्यत्र असे अफूची शेती किंवा लागवड कोणी केले आहे का? या सर्व बाबींचे सर्च ऑपरेशन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. सदर सर्च ऑपरेशन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करणार असल्याचे ते म्हणाले. आरोपी अफूची शेती करण्यास कसा प्रवृत्त झाला? बियाणे कसे उपलब्ध केले? त्याच्या मागील मुख्य सूत्रधार कोणी आहे का ? मार्केटिंग कशी करणार होता ? या सर्व बाबतीत कसून चौकशी करणार असल्याचे पोलिस महानिरीक्षकांनी सांगितले.
चोपडा तालुक्यात अवैध धंदे त्यात गांजा , कट्टे या संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्वात जास्त गांजा, गुटखा व कट्टे याच कालावधीत पकडण्यात आले आहेत. त्यासाठी प्रो ऍक्टिव्ह सर्च ऑपरेशन राबवले जात आहे .त्याद्वारे मुख्य आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. ज्या ठिकाणी कट्टे तयार होतात ते कारखाने उध्वस्त केले आहेत तसेच कट्टा बनवण्याचे मशिनरी सुद्धा उद्ध्वस्त केल्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मूळ मालकाला अटक केली असल्याचे सांगितले. राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी देखील चोपडा येथे एका कार्यक्रमात अवैध धंद्यांबाबत नाराजी व्यक्त केली होती व त्या संदर्भात गृहमंत्री दर तीन महिन्यांनी आढावा बैठक सुद्धा घेत आहेत त्यांनी आतापर्यंत जळगाव, नाशिक व नगर येथे आढावा बैठक घेतली असल्याचे सांगितले.
जिल्ह्याच्या कामगिरी संदर्भात विचारले असता ते म्हणाले, जिल्ह्याच्या पोलिसांची कामगिरी समाधानकारक असून ,आतापर्यंत जिल्ह्यात तीन वेळा मोक्का लावण्यात आला आहे तसेच भुसावळ येथील गँगला त सुद्धा मोक्का लावला असल्याचे सांगितले. गुन्हेगारांना चांगले शासन व्हावे व गुन्हेगारांवर वचक बसावा या पद्धतीचे कार्य जळगाव पोलीस करीत असल्याचे ते म्हणाले.
चोपडा तालुक्यात अवैध गुरे वाहतुकीचे प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे तसेच वारंवार तक्रारी सुद्धा वाढत आहेत या संदर्भात माहिती विचारली असता ते म्हणाले की ,जर गुन्हे दाखल होत असतील तर निश्चितच कारवाई करू असे आश्वासन त्यांनी दिले .पोलिसांपुढे अशा विविध प्रकारचे आव्हाने उभे राहत आहेत आणि सर्व आव्हाने पोलीस स्वीकारतील आणि यशस्वीपणे पार पाडतील अशी ग्वाही व आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सदर बैठकीस जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा पोलिस उपविभागीय अधिकारी भास्कर डेरे पाटील, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, अडावद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण दांडगे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एपीआय अमरसिंग वसावे, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे एपीआय अजित साबळे, संतोष चव्हाण, विनोद पाटील यासह अमळनेर येथील पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पारोळा येथील पोलिस निरीक्षक संतोष भंडारे, एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, मारवड पोलीस निरीक्षक जयेश कलाने यासह विविध पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.