ब्रेकिंगन्यूज- धक्काधायक बाब “गोठा गेला नोटात”
बोदवड पंचायत समिती गोठा अनुदानाची फाईल गायब.
दिनांक:२८ जुलै २०२२ प्रतिनिधि-सतीश बावस्कर
बोदवड: बोदवड येथील पंचायत समिती विहिध अडचणीत सापडली असून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकास होण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणारी गुराचा गोठा अनुदान योजना अनुदानासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या फाईलच सापडत नसल्याचे तक्रार आहे.
गोठा अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्याचे आडनुक होत असून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांचा विचित्र वागण्याच्या शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे रोहियो विभागात लाज खोरीने पुन्हा डोके वर काढले आसुन ग्राम ग्रामसेवकासहित गट विकास अधिकारी काथेपुरी यांचे असलेले दुर्लक्ष चिंतेचा विषय बनलेला आहे बोदवड तालुक्यातील वराड येथील शेतकरी गुरायचे गोठ्याचे प्रकरण जुलै २०२१ पासून पंचायत समिती कार्यालयात दाखल केलेले आहे याबाबत विचारणा करण्यासाठी शेतकरी पंचायत समिती कार्यालयातील रोहयो विभागाच्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दिनेश अंजाळे यांना भेटल्यावर अडिच तास शेतकऱ्याला ताटकळत ठेवत त्यांच्या उर्मटपणे बोलण्याचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्रास शेतकऱ्याच्या पुत्राने नगराध्यक्ष आनंदा पाटील यांना सदरील प्रकार कळवल्यानंतर ते नगरसेवक गोलू बरंडिया व ईतर कार्यकर्ता सहित घटनास्थळी हजर झाले यावेळी प्रकरणाच्या फाईलीच गायब झाल्याचे निदर्शनास आले तसेच कामांत दिरंगाई करणाऱ्या सहायक कार्यक्रम अधिकाऱ्याला खडे बोल सुनावत गट विकास अधिकारी काथेपुरी यांना सदरील प्रकार लक्षात आणुन दिल्यावर कामांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला.
तसेच येथे पैसे दिल्याशिवाय कामच केले जात नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली यावेळी नगराध्यक्ष आनंदा पाटील नगरसेवक गोलू बरंडिया प्रकाश पाटील दीपक माळी अमोल व्यवहारे सचिन राजपूत गजानन बेलदार नितीन शिमरे सुनील पाटील यांच्यासह अन्य असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.