रेल्वेत आढळला साप-प्रवाशी झाले घामाघाम.
वेळेचा गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांचा सुरक्षतेसाठी स्वत:चा विचार न करता सिनी.टिकट निरिक्षक सुकेश कुमार (वसईरोड प.रे.)यांनी पकडले साप.
दिनांक: २९ जुलै २०२२ मुंबई-प्रतिनिधि
पावसाळ्यात मनमोकळी श्वास व योग्य शिकार मिळविण्याकरिता साप बिलातून बाहेर पडतात.आपल्या पोटाची भूख भागविण्यासाठी बिलातून बाहेर आलेले साप साधारणतः एकादी घराच्या कोपऱ्यात,बूटांमध्ये,घराचा अंगणात,किंवा रस्तयाचा कडेला सहच आढडणून येतात. परंतू साप आढणल्यास घाबरून जाऊ नका, सर्पमित्राला संपर्क करा सर्व साप विषारी नसतात अशी जनजागृती सर्पमित्र नेहमी करत असतात.
साप हा घराच्या कोपऱ्यात, बूटांमध्ये,घराचा अंगणात,किंवा रस्तयाचा कडेला आढणला तर सर्प मित्र येऊन पकळतील परंतु चक्क साप हा रेल्वेचा डब्यात आढणला तर बघणार्यांना घाम फुटणे स्वाभिक आहे, अशीच घटना दि.२८ जुलै रोजी संध्याकाळी ७:४५ वा. मुंबई विभागातील पश्चिम रेल्वे च्या वसई रोड स्टेशन येथे ट्रेन क्रमांक २२६३३ हजरत निजामुद्दीन सुपर फास्ट मध्ये घडली.
एक्सप्रेस च्या एस-५ या डब्यात सांप आढळला. व सापाला पाहूनच प्रवाशांना भितीचे घाम फुटले.घटनाची माहिती मिळताच वसई रोड स्टेशन चे आॅन ड्यूटी सिनी.टिकट निरीक्षक सुकेश कुमार यांनी तातळीने एस-५ डब्यात जाऊन व स्टेशन मैनेजर एच.एम मीना (वसईरोड प.रे.) यांचा समक्ष स्वत:च सापाला पकळून डब्यातून बाहेर काढले.
वेळेचा गांभीर्य लक्षात घेऊन प्रवाशांचा सुरक्षतेसाठी स्वत:चा विचार न करता सिनी.टिकट निरिक्षक सुकेश कुमार यांनी केलेले उत्कृष्ट कार्याचे रेल्वे प्रशासनाकडून तसेच प्रवाशांकडून कौतूक केले जात आहे.
हा साप रेल्वेचे डब्यात कुठुन व कसा आला अशी चर्चा ही प्रवाशांमध्ये रंगली होती.