राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भैरवनाथ यात्रा महोत्सवास भेट
भैरवनाथ संस्थांन येथील विकास कामासाठी निधी देणार - राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सोयगाव : येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवा निमित्ताने महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवार रोजी भेट दिली.
श्री भैरवनाथ महाराज जागृत देवस्थान असून सोयगावसह औरंगाबाद – जळगाव जिल्ह्यातील भाविक येथे दर्शनासाठी येतात असे स्पष्ट करीत भैरवनाथ देवस्थान येथे येणाऱ्या भाविकभक्तांच्या सोयीसाठी पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने येथे सुरू असलेल्या सामाजिक सभागृहाच्या कामाची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला यांनी संस्थानच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत सत्कार केला.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे, नगराध्यक्षा आशाबी तडवी, नगर पंचायतेतील शिवसेना गटनेता अक्षय काळे, संस्थानचे अध्यक्ष दिलीप बिर्ला, नगरसेवक संतोष बोडखे, राजू दुतोंडे, कदिर शहा, संदीप सुरडकर, अशोक खेडकर यांच्यासह दिलीप देसाई, शांताराम देसाई, भागवत गावंडे, विजय इंगळे, गजानन कुडके, राजू माळी आदींसह भाविक भक्तांची उपस्थिती होती.