दिनांक : ०५ आँगस्ट २०२२ दिल्ली : सोर्स
हर घर तिरंगा या उपक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला भारताच्या एकजुटीचा संदेश दिला जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. भारतीय घटनेच्या निर्मात्यांना अपेक्षित असलेली देशाची सुरक्षा, समृद्धी आणि विकासाची यात्रा पुढे नेण्यासाठी, प्रत्येक नागरिक एकजुटीने काम करत आहे, असा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार असल्याचं ते म्हणाले.
भारतीय राष्ट्रध्वजाचे निर्माते पिंगली व्यंकय्या यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत आयोजित तिरंगा उत्सवामध्ये ते काल बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येकानं आपापल्या घरावर तिरंगा फडकावून हर घर तिरंगा हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन अमित शहा यांनी यावेळी केलं.