जळगाव जिल्हामहाराष्ट्र
Trending

यावल पोलिस स्थानकाचे नवीन पोलिस निरिक्षक- राकेश मानगांवकर

दिनांक -०४ आँगस्ट २०२२
यावल:‌प्रतिनिधी – यावल पोलीस स्थानकाच्या निरिक्षक पदाचा कार्यभार राकेश मानगावकर यांनी स्वीकारला आहे.येथील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकपदी राकेश आण्णाप्पा मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येथील पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांची आगामी काही दिवसात डीवायएसपीपदी पदोन्नती होत असल्याने त्यांची जिल्हा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. परिणाम या रिक्त पदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी केली आहे.राकेश मानगावकर यांनी गुरूवारी सायंकाळी उशिरा पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांचेकडून पदाची सुत्रे हाती घेतली. राकेश मानगावकर हे नगर येथून बदलून आले आहेत. त्यांनी यापूर्वी कोपरगाव, पाथर्डी आदी ठिकाणी सेवा बजावली आहे.दरम्यान, यावल येथे कार्यभार स्वीकारल्यानंतर राकेश मानगावकर म्हणाले की, येथील पोलिस ठाण्यातील घाण स्वच्छ करणे, व पोलिस स्टाफमध्ये शिस्त लावण्यापासून आपण कामकाजाची सुरवात करणार आहोत. तसेच पोलिस ठाणे हद्दीत वाढलेल्या पन्नी दारूचा नायनाट करण्यासाठी आरोपींविरुध्द अधिकाधिक कडक कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे