वीस हजाराची लाच स्विकारतांना सोनगीर येथील पोलीस नाईक व झिरो पोलीस यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
गुन्ह्यात जप्त केलेली अँक्टीवा गाडी सोडण्यासाठी पोलीस नाईक संजय जाधव याने मध्यस्थी मार्फत मागितले लाचेचे वीस हजार रुपये.
दिनांक-०४ आँगस्ट २०२२ दौंडाईचा-प्रतिनिधि
दोंडाईचा- देवभाने ता. जि.धुळे येथे आज स्वतः ची अँक्टीवा गाडी सोनगीर पोलिस ठाण्यातुन परत मिळवून घेण्यासाठी पोलिस नाईक संजय मधुकर जाधव (वय-४३) यांनी खाजगी इसम ज्ञानेश्वर हिरामण गवळी (वय-३९)राहणार देवभाने याच्या मार्फत तक्रारदाराकडून वीस हजाराची लाच स्विकारतांना धुळे लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर मिळालेली माहिती अशी आहे की,तक्रारदार हे धुळे येथील रहिवासी असून त्यांचे सोनगीर पोलीस स्टेशन येथे जप्त असलेले दुचाकी एक्टिवा वाहन हे परत देण्यासाठी पोलीस नाईक संजय जाधव यांनी त्यांच्याकडे २५,०००/- रुपयांची पंचासमक्ष मागणी करून तडजोडी अंती २०,०००/- रू ची.रक्कम त्यांचे खाजगी इसम ज्ञानेश्वर हिरामण कोळी रा. देवभाने याचे मार्फतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर देवभाने ता.जि धुळे येथे सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष स्वीकारले. सापळा कार्यवाही दरम्यान आलोसे व खाजगी इसम यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.
यावेळी सापळा अधिकारी लाचलुचपत विभागाचे पोलीस उप अधीक्षक श्री.अनिल बडगुजर, सहा.सापळा अधिकारी लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक श्री प्रकाश झोडगे,पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभागाचे श्री.मंजितसिंग चव्हाण, तसेच सापळा पथकात राजन कदम,कैलास जोहरे,शरद काटके, भूषण खलाणेकर,भूषण शेटे,संतोष पावरा ,संदीप कदम, प्रशांत बागुल, रामदास बारेला, प्रविण पाटील,मपोशी वनश्री बोरसे, रोहिणी पवार, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदी होते.
तसेच सापळा यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून नाशिक परिक्षेत्राचे ला.प्र.वि.चे पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने,अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक चे श्री नारायण न्याहळदे, वाचक पोलीस उप अधीक्षक श्री सतीश भामरे यांचे लाभले आहे.