राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते श्री साई सच्चरित संगीतमय दरबार मेरे साई का कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न
सिल्लोड (प्रतिनिधी) सिल्लोड शहरात आयोजित साई कथाकार श्री साई गोपाल देशमुख यांच्या श्री. साई सच्चरित संगीतमय दरबार मेरे साई का या कार्यक्रमाचे उद्घाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले. शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने यांचे चिरंजीव ध्रुवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील 36 एकर मैदानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चि. ध्रुवचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी यावेळी बीड येथील महंत अखंडनंद महाराज, मुर्डेश्वर संस्थानचे पिठाधिश ओंकारगिरी महाराज, नगराध्यक्षा श्रीमती राजश्रीताई निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, वाकी येथील नामदेव महाराज पल्हाळ, शेलगाव येथील दयानंद महाराज, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, महानुभाव पंथाचे दिगंबर दादा, गोळेगाव येथील दिनकर महाराज औटी , निल्लोड येथील रामेश्वर महाराज यांच्यासह कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शंकरराव खांडवे, मनोज झंवर, सुधाकर पाटील, शिवसेनेचे मतदारसंघ संघटक सुदर्शन अग्रवाल, महिला आघाडीच्या दीपाली भवर, डॉ. दत्ता भवर, दीपकसेट अग्रवाल, सुनील पालोदकर, नारायण फाळके, डॉ. निलेश मिरकर आदींसह साई भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.