महाराष्ट्रराजकीय

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते खंडाळा येथील गोल्डन स्पन अँड इन्फ्रा एलएलपी प्रोडक्टसचे उदघाटन संपन्न

वैजापूर (प्रतिनिधी) सर्वसामान्यांच्या आयुष्यात विविध समस्या आणि अडथळे कायम येत असतात. हाजी अकिल यांचे जीवन देखील संघर्षमय राहिले. त्यांच्या अथक प्रयत्न व ध्येयामुळे ते आज उद्योजक म्हणून ओळखल्या जात असून त्यांनी सुरू केलेल्या उद्योग समूहातून अनेकांना जोरगार मिळत असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी वैजापूर येथील गोल्डन स्पन प्रोडक्टस च्या उदघाटन प्रसंगी केले.

मेहनत, जिद्द आणि ध्येय ज्यांच्याकडे असते त्याला विकास आणि प्रगतीचे मार्ग कठीण नसतात असे स्पष्ट करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी हाजी शेख अकिल यांच्या गोल्डन प्रोडक्टस प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. येथील हाजी शेख अकिल यांच्या खंडाळा ता. वैजापूर येथे नव्याने सुरू झालेल्या गोल्डन स्पन अँड इन्फ्रा प्रोडक्टसचे उदघाटन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवार (दि.26) रोजी संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती जीवनलालजी संचेती होते. खा. इम्तियाज जलील, आमदार प्रा. रमेश बोरणारे , माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भाऊसाहेब काका ठोंबरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, बाळासाहेब संचेती, राजुसेट राजपूत, जिल्हा बँकेचे संचालक रामहरी बापू जाधव, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतिष ताठे, सिल्लोड चे नगरसेवक रउफ बागवान, आरिफ पठाण, हाजी शेख आयुब, संजय मुरकुटे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी , व्यापारी आदींची उपस्थिती होती.

यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी आयोजकांच्या वतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भव्य स्वागत सत्कार करण्यात आले. खंडाळा येथील स्मशानभूमीच्या जागेचा तिढा सोडवण्यासह गावात अंतर्गत रस्ते व ड्रेनेजलाईनसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा यासाठी तातडीने मंजुरी देवू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. वैजापूर सोबत कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले वैजापूर वासीयांनी जे प्रेम व आदरातिथ्य केले याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे