कपिलनगर वस्ती ते जाडगांव फाटा सर्विस रोड वाढवणे ; जाडगांव ग्रामस्थांकडून रस्ता रोको आदोलानाचा इशारा
भुसावळ (प्रमोद बावस्कर) भुसावळ तालुक्यातील जाडगांव ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्याकडून दि. 8 मार्च 2022 रोजी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण जाडगांव यांना निखिल सुरवाडे सरपंच जाडगाव व ग्रामस्थ यांनी लेखी स्वरूपात कपिल वस्ती ते जांडगांवफाटा असा सर्विस रोड वाढवण्याच्या मागणी केली असता कपिल नगर वस्ती पासूनविरुद्ध दिशेने यावे लागते. त्यामुळे बहुतेक वेळा अपघात झाले असे संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून दिली असता जाडगाव फाट्यावरतीगावाचा नाम फलक लावण्यात आला होता तोसुद्धा तिथून हटवण्यात आला.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण रस्त्याचे काम प्रगतीपथावर होत असता माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या आमदार निधीतून मंजूर बसस्थानक बांधलेले होते तेसुद्धा कामाकरत्यावेळी ते तोडण्यात आले. अशा सर्व अडचणी साठी लोकप्रतिनिधी यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे वेळोवेळी चर्चा केली असता त्यांनी फक्त आश्वासन दिले प्रत्यक्ष कोणतेच काम केले नसून जाडगाव ग्रामस्थ आक्रमक आता दिसून येत आहे. या मागणीसाठी दिनांक 29/03/2022 रोजी जांडगाव फाटा रस्ता रोको आंदोलन जागेवर करण्यात येणार असे सहाय्यक पोलीस निरीक्षक वरणगांव पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले असे निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे.



