गोदावरीतील पाणवेलिंचा प्रश्न गंभीर !
नाशिक (मनोज साठे) भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळख असलेल्या गोदावरी नदीचा प्रदूषणाचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. उन्हाळा आला की गोदावरीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत असून नदी पात्रात जलपर्णीचा विळखा वाढतच आहे.
शासन स्तरावर प्रत्येक वर्षी जमेल तेवढ्या प्रमाणात जलपर्णी काढण्याचे कार्य केलं जाते. पण ते तात्पुरत्या स्वरूपात असते. जलपर्णी कायम स्वरुपी काढण्यासाठी शासनना कडून ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकीकडे नदीच्या पात्रात स्मार्ट सिटीचे काम जोरात सूरू असून दुसरी कडे मात्र नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीकाठच्या नागरीकांच्या आरोग्यबरोबरच जलचरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहे. पिण्यायोग्य पाणी नसल्याने काही गावांची शुद्ध पाण्यासाठी वणवण सूरू आहे. त्यातच जलपर्णीच्या समस्येने पुन्हा भर घातली आहे. तेव्हा प्रशासनाने वेळीच ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे, अशा प्रतिक्रिया जनसामान्यतून उमटत आहेत.