शिंदखेडा येथे रविवारी रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र योजनेचा शुभारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती शिंदखेडा यांच्या प्रयत्नाने सुरवात
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती शिंदखेडा वतीने रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र योजना चा शुभारंभ वीरसावरकर पतसंस्था बस स्थानक येथे रविवारी सकाळी नऊ वाजता होणार मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
सदर योजनेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.देवेंद्र भास्कर राव पाटील (शिंदखेडा) तर ह.भ.प.मेघशाम महाराज (मठाधिपती बालाजी संस्था शिंदखेडा) प्रमुख वक्ते म्हणून वैशाली अशोक खेडकर (राष्ट्र सेविका समिती देवगीरी प्रांत सेवा प्रमुख नंदुरबार) लाभणार आहे. यावेळी संजय चौधरी (धुळे जिल्हा संघचालक) डाॅ.सुधीर साठे (अध्यक्ष जनकल्याण समिती धुळे) हितेंद्र जैन (शिंदखेडा तालुका संघचालक)हेमंत कापडी (धुळे जिल्हा कार्यवाह) हे उपस्थित राहणार आहेत.रुग्णोपयोगी साहित्य सेवा केंद्र योजना अंतर्गत अपघातामुळे व दुखापतीने अपघात ग्रस्त व्यक्तीला रुग्णालय सोडल्यावर ही विविध उपकरणांची गरज भासते. त्यात वाॅकर, व्हिल चेअर, व्हिल स्टिक, कुबड्या. फाऊलर बेड, कमोड चेअर, एअर बेड, वाॅटर बेड, आॅक्सीजन काॅन्सनट्रेटर आदींची आवश्यकता असते. म्हणुन शिंदखेडा येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जयवंत शिंपी, मयूर पवार, प्रा.प्रदीप दिक्षित, परेश शहा, जितेंद्र मेखे, शरद पाटील, विनोद सोनवणे, दिपक सोनार, दिपक चौधरी, सुभाष माळी, अजय कनोजिया, संजय गिरासे, सागर कासार यांनी केले आहे.