वैजापूर तालुक्यातील डोणगाव येथील गोदावरी पूर घोटाळा उघडकीस
वैजापूर (प्रतिनिधी) डोणगाव दि. ४ ते ७ ऑगस्ट 2019 या कालावधीत रुपये 14 लाख 63 हजार 745 रुपये रकमेचा शासनाच्या तिजोरीतून बेहिशोबी वाटप केल्याबाबत डोणगाव गोरख शिवनाथ डोखे गट नंबर 166 उताराप्रमाणे 0.57 आर क्षेत्र असताना 0.80 दाखविले. 40 शेती नुकसान 40 आर मका दाखवण्यात आले. गट नंबर 49 एकनाथ नाना अल्पशिक्षित असताना इंग्रजीत बनावट सही मारली गट नंबर 17 पंचनामा करत असताना पंच नंबर 4.निरक्षक असताना इंग्रजी बनावट सही मारली पंच नंबर पाच 2014 ला मयत असताना 16 -8 -2019 रोजी त्याची इंग्रजीत सही केली.
गट नंबर 115 116 126 नदीपासून अंदाजे आठ किलोमीटर असताना पूररेषेत नसताना पंचनामा करून मदत देण्याचा प्रयत्न केला तसेच खातेदारांनी मदत लुटण्याचा प्रयत्न केला. ठरावीक पंचांनी वारंवार सह्या घेऊन खोटे कागदपत्रे तयार केली ते खरे दाखवून गोदावरी नदीचा पूरग्रस्त निधी हडप केला. फसवणूक केली. त्यांच्यावरती 420 467 468 471 120 प्रमाणे गुन्हा केला असे असताना चौकशी अधिकारी तत्कालीन नायब तहसीलदार दिपाली खेडेकर व तहसीलदार राहुल गायकवाड यांनी आरोपीला गुन्ह्यातून वाचवण्यास मदत केली याबाबत वेळोवेळी सरकारी दप्तरी तक्रारी नोंद असताना दखल घेतील जात नाही वरिष्ठांचा आदेश आला केराची टोपली दाखवण्यात आली.
वरिष्ठ पत्रव्यवहार उपविभागीय अधिकारी वैजापूर जिल्हा अधिकारी विभागीय आयुक्त औरंगाबाद लोक आयुक्त मुंबई 32 वारंवार स्मरणपत्र देऊनही उपयोग होत नाही. तरी योग्य न्याय मिळावा व दोषींवर सी आर पीसी कलम 197 प्रमाणे परवाना मिळावा. घोटाळा सहभागी तलाठी राकेश बाळू बच्छाव, कृषी सहाय्यक आदिनाथ ज्ञानदेव सपाटे, ग्रामसेवक संजय जयसिंग राठोड व इतर अमोल गोरख डोखे, चंद्रकांत एकनाथ डोखे, राहुल पोपट डोखे, गजानन माणिक डोखे, बाळकृष्ण बाबासाहेब गायके, गोरख शिवनाथ डोखे, सचिन बाळासाहेब डोखे, सिद्धांत चंद्रकांत डोखे इत्यादी पंच लोक होते. एकीकडे शेतकरी जीवन कसे जगावे यासाठी लढा देत आहे तर दुसरीकडे शासनाचे कर्मचारी शासनालाच लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे.