शेत-शिवार
मका उत्पादनात १० ते १५ टक्के घट
गोंडगाव ता. भडगाव (सतीश पाटील) निसर्गाच्या अनियमित व ढगाळ लहरीपणामुळेमका पिकावर अनिष्ट परिणाम झाला असून कणीसाच्या वरील भाग हा लष्करी अंळीने मोठ्या प्रमाणात पूर्णता फस्त केला असून मका पिकावर परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनातवर दहा ते पंधरा घट होणार आहे. गणेश दुधाळ अवस्थेत असताना रानडुकरांनी पिकाची नासाडी केली. विजेच्या समस्येमुळे शेतकरी त्रस्त झाला. बळीराजाच्या संकटात वाढ होत उत्पादनावर विपरीत परिणाम झाला. खर्च देखील मोठ्या प्रमाणातवाढ होवून उत्पादन कमी झाले आहे.