महाराष्ट्र

धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी तपासणी व मोफत ऑपरेशन शिबीर

अमरावती (पंकज मालवीय) धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात आज दिव्यांगांसाठी तपासणी शिबीर व दंत व मोफत ऑपरेशन शिबीर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते झाले.

शिबिरात दृष्टिहीन, अंध, मूकबधिर, अपंग यांच्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. येथील उपजिल्हा रुग्णालयात झालेल्या शिबिरात तपासणीअंती अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच भव्य आरोग्य व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये शरीरातील मोठे गळू किंवा गुठळ्या, हर्निया, हायड्रोसेल, नाक, कान, घसा ऑपरेशन, दातांसंबंधी विविध आजारांचे निदान व ऑपरेशन, स्त्रीरोग नसबंदी, बालरोग, कुपोषण व इतर सर्व आजारांवर मोफत उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आमदार राजकुमार पटेल यांच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यकर्ते कालू मालवीय, पा.छोटू देशमुख, पीए रुपेश भारती आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे