ॲड सागर वाहुळ पाटील यांचा सोल्जर ऑफ डेमोक्रसी पुरस्काराने सन्मान
मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे लीगल, ह्यूमन राइट्स व आरटीआय डिपार्टमेंट च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्माननीय ॲड रविभाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे टिळक भवन मध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा व तसेच ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी व गरीब व कष्टकरी व तसेच वकील बांधव यांच्यासाठी कायदेशीर मार्गाने लढा लढून काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविण्याचे काम अहोरात्र करत आहेत, अशा काँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान सोल्जर ऑफ डेमॉक्रसी हा पुरस्कार देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे लीगल, ह्युमन राइट्स व आरटीआय डिपार्टमेंटचे सरचिटणीस नाशिक विभाग सहप्रभारी ॲड सागर वाहुळ पाटील यांचा सोल्जर ऑफ डेमॉक्रसी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लीगल, ह्यूमन राइट्स व आयटीआय डिपार्टमेंट चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड विपुल माहेश्वरी तसेच ऑल काँग्रेस काँग्रेस सचिव आशिष दुआ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते सन्माननीय अतुल लोंढे, न्यायमूर्ती ठिपसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व ॲड रवी प्रकाश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार सोहळा अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात काँग्रेसचे मुख्य कार्यालय टिळक भवन येथे पार पडला. यावेळी महाराष्ट्रातील शेकडो वकील बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. ॲड सागर वाहूळ यांना सोल्जर ऑफ डेमॉक्रसी हा पुरस्कार मिळाल्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांनी, वकील बांधवांनी ॲड सागर वाहुळं यांचे कौतुक केले व अभिनंदन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटोले यांनी दिल्लीवरून झूम मीटिंग द़वारे या कार्यक्रमाला उपस्थिती लावून सर्वांना शुभेच्छा दिल्या.