महाराष्ट्र

शिंदखेडा येथे खान्देशी रक्षक संस्थेच्यावतीने सिडीएस रावत व अन्य शहीद जवानांना भावपूर्ण आदरांजली

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील भगवा चौक व शिवाजी चौफुलीवर शिंदखेडा तालुका खान्देशी रक्षक संस्था व शहरातील विविध पदाधिकारी यांच्यावतीने आयोजित देशात कधी नव्हे अशी दुर्दैवी घटना तामिळनाडू राज्यातील घनदाट जंगलात हेलीकॉप्टर क्रॅश होऊन भारतीय लष्कर दलाचे CDS चीप ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नी श्रीमती मधुलिका रावत आणि अन्य अधिकारी व वीर जवान शहीद झाले. त्याप्रती दुखःद भावना खान्देशी रक्षक संस्थेचे तालुकाध्यक्ष माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आजी माजी सैनिकांच्यावतीने सामुदायिक भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी शोकमग्न असलेल्या सर्व सैनिक यांनी हळहळ व्यक्त केली. भारतीय लष्करचे चीप ऑफ डिफेन्स स्टाॅप जनरल बिपीन रावतसह पत्नी मधुलिका रावत यांच्यासह बारा सेना दलाचे जवान दुर्घटनेत शहीद झाले. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो व दुखःत सहभागी आहोत यासाठी सामुदायिक भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे असे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गिरासे यांनी सांगितले. यावेळी कार्यध्यक्ष नंदलाल साळुंखे, सहसचिव संजीव नगराळे, सचिव प्रमोद बोरसे, शहराध्यक्ष भावसिंग गिरासे रक्षक कैलास ठाकरे, शांताराम जाधव, देविदास कोळी, प्रमोद गुरव, कार्य उपाध्यक्ष भुषण पवार, चंद्रकांत पाटील, प्रकाश परदेशी, दिलीप पाटोळे, रितेश अहिरराव, बाबुलाल जगदाळेसह सिव्हिल सपोर्ट सचिन गिरासे, हर्षल पाटील व अन्य पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे