ब्रेकिंग
Trending

पुला बाजूने कुठलीही उपाय योजना नसल्याने गावकरी वृद्ध नागरिक, विद्यार्थी त्रस्त

राजेश पडोळे : अमरावती

चांदुर बाजार : अमरावती जिल्ह्यातील देवरा देवरी येथे पुलाचे काम सुरु असल्याने बांधकाम विभागाने आजूबाजूला कुठलेही उपाय योजना लोकांना येण्या जाण्या साठी केली नाही त्यामुळे देवरा गावा जवळील नागरिकाचे मोट्या प्रमाणावर हाल होत आहे वारंवार सूचना देऊन सुद्धा बांधकाम विभाग या साठी कुठल्याही उपाय योजना करत नसल्याने गावातील नागरिक आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून प्रवास करत आहे गेल्या कित्येक दिवसा पासून बांधलेले पुलाचे काम बंद असल्याने शालेय विद्यार्थी व शेतकरी यांना मोट्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्यामध्ये शालेय विद्यार्थी याचे मोठे नुकसान होत आहे देवरा येथे शिक्षण घेण्यासाठी 1 किलोमीटर च्या प्रवासा साठी 22 किलोमीटरचा फेरा विद्यार्थी यांना मारावा लागत आहे हे शक्य नसल्याने काही गरीब विद्यार्थी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यातून प्रवास करून शिक्षण घेत आहे या मध्ये सार्वजनिक बांधकाम याचे मोट्या प्रमाणात दुर्लक्ष झालेले आहे दोन दिवसा आधी या पुरा मध्ये मोठा अनर्थ टळला आहे काही शालेय विद्यार्थी पुराच्या पाण्यामधून शिक्षण घेण्यासाठी अंतोरा येथून देवरा येथे शिक्षण घेण्यासाठी जात असताना पुराच्या पाण्यात पाय घसरून 6 विद्यार्थी वाहत असलेला प्रकार एका बाजूने असलेल्या शेतकरी यांना दिसला त्यांनी तात्काळ धाव घेऊन त्या सहा विद्यार्थी यांना आपल्या जीवाची पर्वा न करता प्राण वाचून सुखरूप बाहेर काढले तरी सुद्धा बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांना जाग आली नाही मग मोठा अनर्थ होणार तेव्हा जाग येणार का असा प्रश्न देवरा गावतील नागरिक यांनी केला आहे त्या मुळे येथे होणारी जीवित हानी टळली आहे तरी सुध्दा बांधकाम विभाग यांना जाग आली नाही आहे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सुद्धा पाहणी करून बांधकाम विभाग तात्काळ काही उपाय योजना करा असे आदेश देऊन सुध्दा या कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे असा आरोप गावतील नागरिक यांनी केला आहे जर येणाऱ्या आठ दिवसांमध्ये बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांनी जर काही उपाय योजना न केल्यास अंतोरा सावंगा , देवरा देवरी नांदुरा येथील गजानन देशमुख उपसरपंच, वसंतराव ठाकरे, पवन ठाकरे, घनश्याम पिकले, अवधूत कोरडकर, नितीन नागपूरकर, प्रवीण मदानकर , विजय ढोले, अनिल कडू ,काशीराव नांदणे, अरुण शिंदे, उत्तम पारिसे, गावतील सर्व नागरिक व काही विद्यार्थी आम्ही एकत्र येऊन या पुलाच्या पाण्यात आत्मदहन करू व या मध्ये कोणाला काही झाल्यास सार्वजनिक बांधकाम जबादार राहील असा मोठा ईशारा आजूबाजूला असलेल्या गावतील नागरिक यांनी केला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे