धारणी तहसीलच्या हरिसाल गावात श्रीराम जन्मोत्सव साजरा
धारणी (इंद्रकुमार राजनकर) हरिसाल येथे श्रीराम जन्मोत्सव निमित्त भव्य रॅली काढण्यात आली. समस्त गावकरी व आजू बाजूच्या गावाचे लोक हजारो संख्येने आले होते. रॅली मध्ये अप्पा पाटील व गावाचे पटेल सरपंच गणेश येवले उपस्थित होते. यावेळी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना असल्यामुळे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला नव्हता. यावेळी व्यवस्थापन समितीचे लोक, सरपंच गणेश येवले, राम सावरकर, दीपक शनिवारे, देवा शनवारे, अमित पडोकर, जांद्रा मावस्कर, रितेश पार्लिवार, देवा गायन, मयूर शिंपी, मनीष छानेवारे, गणेश शनवारे, रमेश मेश्राम, दीपक नागले प्रवीण पडोकर आदी नागरिक उपस्थित होते. रॅली मध्ये जय श्रीरामचे नारे गुंजत होते. डीजे व बँड पार्टी फुलवले आणि जोरा शोराने वाजवले. बाहेरून आलेले लोकांना चिल्ड वाटर व नाश्ता, पोहे, खिचडी, शरबत वाटप केले.