धुळे : या खरीप हंगामात गणेशपुर शिवारात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शिवारातील सर्व शेतांमध्ये सर्वत्र पाणीसा असल्यामुळे कपाशी मका सोयाबीन बाजरी तूर उडीद मूग पिके पूर्णपणे सडलेली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे हाती कोणतेही पीक येणार नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यासाठी शासनाने त्वरित सर्व पिकांची पाहणी करून पंचनामे करावे व सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉक्टर हरिचंद्र सिसोदे सोमनाथ सूर्यवंशी प्रेमसिंग सूर्यवंशी भीमसिंग राजपूत रवींद्र निकुंभ कमलाबाई सूर्यवंशी जिजाबाई सूर्यवंशी बाळू सिसोदे प्रेमसिंग राजपूत कपिल ठाकरे रवींद्र निकुंभ बाळू निकुंभ भगतसिंग सूर्यवंशी तारासिंग सूर्यवंशी ते आदिसह शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते.



