जामनेर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी महेंद्र (नाना ) बाविस्कर
जामनेर ता. प्रतिनिधी :- ईश्वर चौधरी
जामनेर : नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी भारतीय जनता पार्टी चे महेंद्र बावीस्कर यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड जामनेर नगरीच्या नगरध्यक्षा सौ साधना गिरीष महाजन जामनेर तहसिलदार अरुण शेवाळे जामनेर नगर परिषद मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड पार पडली.
यावेळी जामनेर शहरातील नगरसेवक भारतीय जनता पार्टी चे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते महेंद्र बावीस्कर हे नगर सेवक आहेत जिद्द, चिकाटी आणि स्वकर्तृत्वावर त्यांनी यश संपादन केले आहे.
महेंद्र बावीस्कर यांचा बोलका स्वभाव आणि सर्वसामान्य लोकांना मदत करण्याची वृत्ती असल्यामुळे माननीय ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी महेंद्र बावीस्कर यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पदी विराजमान होताच महेंद्र बावीस्कर यांनी जामनेर शहरातील अतिक्रम धारकांचा लवकरच प्रश्न मार्गी लावू असे पत्रकारांना म्हटले महेंद्र बावीस्कर यांच्या निवडीबद्दल परीसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जामनेर नगर परिषद जवळ गुलाल उधळण्यात आला फटाक्यांची आतीष बाजी करण्यात आली मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले.