गोवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत असतानाच काँग्रेससाठी मोठा धक्का गोव्यात बसला आहे. काँग्रेसचे 8 आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याचे कळले आहे.
यामध्ये दिगंबर कामत यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे. गोव्याच्या राजकारणातील हि मोठी घटना असून. या घटनेमुळे भाजपचे गोव्यात ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्याच्या चर्चा सद्या जोरात सुरु आहे.
कॉन्ग्रेस चे हे ८ आमदार भाजप मध्ये जाणारे असल्याचे बोलले जात आहे
मायकल लोबो (माजी विरोधी पक्षनेते), राजेश फळदेसाई,दिलायला लोबो, लेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, रुदाल्फ फर्नांडिस, केदार नाईक, दिगंबर कामत हे असल्याचे समजते.