महाराष्ट्र
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणा-या आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदत
औरंगाबाद (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणा-या आंदोलकांच्या वारसांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय संभाजीनगर येथे प्रत्येकी १० लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार-शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, जि प अध्यक्षा मिनाताई शेळके, विनोद पाटील, अभिजित देशमुख, अनिल बोरसे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.