डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संदेश भूमी येथे अस्थी कलश दर्शन
धुळे (प्रतिनिधी) राष्ट्रनिर्माते बहुजनांचे उद्धारकर्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संदेश भूमी येथे अस्थी कलश दर्शन व अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
31 जुलै 1937 रोजी परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेश भूमी येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सदर पावन भूमी संदेश भूमी येथे अस्थिकलश स्थापन करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खानदेशातील निष्ठावंत अंगरक्षक सखाराम केदार पैलवान हे पुढे जाऊन बौद्ध भिक्षू झाले व त्यांचे नाव पूज्य भन्तेजी संघरत्न असे पडले होते. भन्ते संघरत्न हे धुळे येथे परत येत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी धुळे येथे आणले. कालांतराने अस्थी प्राध्यापक बाबा हातेकर यांच्या स्वाधीन केली होती. आता ती अस्थी ही संदेश भूमी येथे स्थापन करण्यात आलेली आहे. संदेश भूमी हे महापवित्र स्थान झाले आहे. या महापवित्र स्थानी आज बाबासाहेबांना अभिवादन केले आणि बाबासाहेबांनी दिलेला महान संदेश बाबासाहेबांचे महान विचार व बाबासाहेबांनी आपल्या रक्ताने घामाने परिश्रमाने आणि अथांग संघर्षाने आपले जीवन प्रज्वलित केले.



