प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने महापरिनिर्वाणदिनी महामानवाला अभिवादन
सोलापूर (रामदास कांबळे) प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना व स्वर्गीय कल्याणराव कांबळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने जयभीम हा चित्रपट दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य करमाळा तालुका मार्केट कमिटीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संतोष वारे यांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
यावेळी वारे बोलताना म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी बाबासाहेबांच्या विचारांचे तरुणांनी अनुकरण करणे गरजेचे आहे. संविधानावर प्रतिगामी लोकांचा आघात सुरू आहे पण या आघाताला परतवून लावण्याची ताकत संविधानात आहे असे मत वारे यांनी व्यक्त केले. यावेळी वारे यांनी प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या लोकपयोगी कार्याचे कौतुक केले व पुढील काळात प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या कार्याला सहकार्य राहील असे त्यांनी म्हटले. यावेळी जनतेचे नगरसेवक जयकुमार कांबळे, पंचायत समिती सदस्य विलास मुळे, मार्केट कमिटी संचालक सरस्वती केकान, रावगांवचे सरपंच दादासाहेब जाधव, राजीव गांधी यांचे सचिव भास्कर भाऊ पवार, माजी उपसरपंच काकासाहेब पवार, अँड .राहुल कांबळे, डाँ. राहुल जाधव, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शहाजी शिंदे, विलास लोंढे, प्रवीण कांबळे, राजू पवार, पवन पवार, गणेश पवार, गणेश जाधव, भरत धगाटे, संदीप पवार, अमोल पवार, विजय पवार, बापू पवार मेजर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यांनी मानले.