नाशिक
श्री महावीर विद्यालयात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिन निमित्त विनम्र अभिवादन !
लासलगाव ता. निफाड (प्रतिनिधी) श्री महावीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य कैलास भारती यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे एन.सी.सी. ऑफिसर राजेंद्र बनसोडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्राविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक ज्ञानेश्वर मोहन यांनी केले. तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सतिष पवार यांनी केले. या कार्यक्रमास विभागप्रमुख योगेश जैन, उपशिक्षक युवराज अहिरे, राजेंद्र जैन, उपशिक्षिका गायत्री पवार, त्रिवेणी जाधव तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.