गुन्हेगारीजळगाव जिल्हामहाराष्ट्र
Trending
शहरात महिलांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ.
भुसावळ: अखिलेशकुमार धिमान
दिनांक- १४ सप्टेंबर २०२२
शहरातील साकरी फाट्या जवळील हॉटेल मधूवन च्या पाठीमागे एका अनोळखी महिलांचे मृतदेह मिळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि आज दि. १४ सप्टेंबर रोजी सकाळी हॉटेल मधुबन च्या पाठीमागे एका अनोळखी महिलांचे मृतदेह परिसरातील नागरिकांना दिसल्याने त्यांनी लागलीच पोलीस स्टेशनला घटने बाबत माहिती दिली. काही क्षणात पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले असून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे.नेमके महिलेचा खून करण्यात आलेला आहे की महिलेला मारून दुसऱ्या ठिकाणावर आणून ठेवण्यात आलेले आहे ही एक संशोधनाची बाब आहे.
घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल गायकवाड तसेच गुन्हे शोध पथकातील कर्मचारी पोहचून महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राथमिक अंदाजे हे मर्डर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.