चोपडा शहर पोलीस स्टशनचे वार्षिक तपासणीत उत्तम कामगिरी : पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे
चोपडा (विश्वास वाडे) चोपडा शहर पोलीस स्टेशनचे वार्षिक तपासणीसाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे चोपड्यात येणार असल्याने सर्व वाहतूक मार्ग मोकळ्या करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक यांच्या स्वागतासाठी पोलीस स्टेशनच्या परिसरात कधी नव्हे एवढी स्वच्छता करण्यात आली होती. त्या प्रमाणे रांगोळी, फुलांचे सजावट पोलीस अधीक्षक यांना खुश करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न यावरून दिसून येत होता वार्षिक तपासणी संदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी पोलिसांची कामगिरी अधिकार्यांची कामगिरी विविध गुन्ह्यची तपासणी या संदर्भात पोलिस स्टेशनचे कामकाज उत्तम कामगिरीपने चालतं असल्याचे सांगितले.
तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी हितगुज विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोरोना पॉसिटीव्ह असलेल्या कार्मचारी यांच्या तब्येतीची चौकशी केली असता कार्मचारी यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयातही वार्षिक तपासणीत करण्यात आली. चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात भेट दिली.