जामनेर-नेरी येथील महाराष्ट्र फटाका येथे सर्व नियम धाब्यावर ग्राहकांचा जीवाला धोका.
जळगांव-अखिलेशकुमार
दिनांक २५ आँक्टोबर २०२२
जळगांव : नेरी येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी फटाके विक्री जोरात सुरु असल्याचे दिसत आहे, परंतु महाराष्ट्र फटका येथे सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेले असल्याचे दिसत आहे.
मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. महाराष्ट्र फटाका येथे आपत्कालीन स्थितीत काही घडले तर फक्त दोन वाळू च्या बादल्या भरलेल्या असल्याचे दिसले त्याचाही वापर गुटखा थुंकण्यासाठी करत असल्याचे दिसत आहे.
तसेच पाण्याची फक्त अर्धी बादली भरलेली दिसली. तर अग्निशामक यंत्र एका टेबलाखाली अडगळीत असल्याचे दिसले.
हा सर्व प्रकार बघता या ठिकाणी अचानक कुठला प्रसंग उदबवल्यास जीवित हानीची शक्यता नाकारता येत नाही.
जाणकारांचे म्हणणे आहे की या ठिकाणी कुठला प्रसंग उदबवल्यास कोण जबाबदार असेल? प्रशासन दखल घेईल कि महाराष्ट्र फटाका चालकास पाठीशी घातले जाईल हा प्रश्न ह्या ठिकाणी सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.